ताज्या बातम्यानांदेडबिलोली

चिटमोगरा येथे शासकीय गायरान जमिनीवर अवैध मुरूम उत्खनन करणारा जेसीबी जप्त

मोरे मनोहर

किनाळा :- बिलोली तालुक्यातील मौजे नवीन चिटमोगरा येथील शासकीय गायरान जमीन (गट क्र. १४८) मध्ये दि.१४ जुलैच्या मध्यरात्री जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन केले जात असल्याची माहिती महसूल विभागांना मिळाली असता चिटमोगरा येथील ग्राम महसूल अधिकारी एस बी घोंगडे यांनी रात्रीच्या पावणे बारा ते बाराच्या सुमारास घटनास्थळी गेले असता त्यांना एक जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन करत असल्याचे आढळून आले असता जेसीबी पकडून रामतीर्थ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले मात्र घटनास्थळावरील दोन ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले असून या प्रकरणी बिलोली तहसील कार्यालयात कायदेशीर फिर्याद देण्यात आली असून यावर काय कारवाई होणार याकडे अनेकाचे लक्ष लागले आहे.

अधिक माहिती अशी की बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती व मुरूम सर्रासपणे रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा कर बुडवून चोरीच्या मार्गाने नेला जात असल्याचे दिसून येत असताना चिटमोगरा येथील शासकीय गावरान जमीनीवर जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन केले जात आहे
असी गोपनीय माहिती येथील ग्राम महसूल अधिकारी एस बी घोंगडे यांना मिळाली असता त्यांनी दिनांक 14 जुलै रोजी रात्री पावणे बारा ते बाराच्या दरम्यान घटनास्थळी गेले असता सदरील शासकीय गायरान जमिनीवर जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले.

ग्राम महसूल अधिकारी एस बी घोंगडे हे घटनास्थळी जाऊन सदरील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी गावातील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना घटनास्थळी बोलावून घेऊन जेसीबी व ट्रॅक्टर पकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केले असता त्यांच्याशी सदरील जेसीबी चालक व ट्रॅक्टर चालकासह गावातील काही नागरिकांनी चक्क ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आज पर्यंत कित्येक जणांनी जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस अवैध मुरूम उत्खनन केले तेव्हा तुम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई का केली नाही म्हणून त्यांच्याशी जेसीबी चालकासह गावातील काही नागरिकांनी हुज्जत घालत वाद करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणालाही न जुमानता सदरील घटनास्थळावरील जेसीबी रामतीर्थ पोलीस ठाण्यात आणून जप्त करण्यात आला मात्र घटनास्थळावरून दोन ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी जेसीबी चालक शशीपाल गंगाधर तोटरे (रा. धामणगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) यांच्याविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात आणि बिलोली तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी एस बी घोंगडे यांनी रीतसर तक्रार दिली असून फरार ट्रॅक्टरची ओळख पटवून संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.

बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती व मुरुम उत्खनन केले जात असतानाअवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना माहिती देणाऱ्या पत्रकारांना आणि जागरूक नागरिकांनाच अवैध रेती व मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियाकडूनच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असल्याने या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून मुरूम माफिया विरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व गोपनीय माहिती देणाऱ्यांना आवश्यक संरक्षण द्यावे अशी मागणी केली जात असुन अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या विरुद्ध काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker