ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

एकरी 100 टन ऊस काढा योजनेचा लाभ घ्यावा… कारखाना प्रशासनाच्या वतीने शेतक-याना आहावान

प्रल्हाद हिवराळे
उमरी :- उमरी व्हिपीके उद्योग समूहातील तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी आडसाली ऊस लागवड ही नवीन योजना गुरूजी समुहाने शेतकऱ्यांसाठी अंमलात आणली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखाना प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एकरी १०० टन ऊस काढेल त्यांना प्रथमता लागवडीसाठी प्रति एकरप्रमाणे एक टन बेणे, १०. २६. २६ चेतिन पोते खत, रोपे पध्दतीने लागवड केल्यास त्यांना एकरी ५ हजार रोपे दिले जाईल. सदर रोपे या मागणीसाठी २५ दिवस अगोदरच रोपेचे बुकींग मागणी करावे लागेल. सदर जाहिर केलेल्या योजनेला लागणारा खर्च असेल तो खर्च ऊस तोडणीच्या वेळी
शेतकऱ्यांकडून घेतला जाईल.

आडसाली ऊस लागवड करून या योजनेचा लाभ जास्तीजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, एकरी १०০০ टन ऊस काढावे, असे वाघलवाडा साखर कारखान्याचे ऊस विकास मार्गदर्शन आधिकारी साईप्रसाद सावंत यांनी आवाहन केले आहे. भागातील शेतकऱ्यांनी एकरी १०० टन ऊस काढेल त्या शेतकऱ्यांना बक्षीस पात्र समजून २ लाखांची बुलेट तर एकरी १५० टन ऊस काढेल त्या शेतकऱ्यांना चारचाकी बोलेरो गाडी बक्षीस, पाचट कुटी मशीन, कडबा कुटी मशीन, एक लुना गाडी, पिठाची गिरणी, पॉवर टिलर यासह अनेक योजना देण्याचे या साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरूजी यांनी जाहीर केले.

जो शेतकरी या स्पर्धेत सहभाग घेईल त्या शेतकऱ्यांना ऊस लागवडी पासून ते ऊस तोडणीपर्यत वेळोवेळी ऊस तंज्ञाकडुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन देण्याचेही जाहीर केले. काखान्याच्या परिसरातील जास्तीजास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे आणि आपली आर्थिक बाजू सुधारली पाहीजे. शेतकऱ्यांना कोणाकडे हात पसरविण्याची पाळी येणार नाही अशा व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी अंमलात आणल्या असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker