क्राईमताज्या बातम्यानांदेड

बिलोलीच्या अल्पवयीन मुलीवर नायगाव तालुक्यात अत्याचार

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : बिलोली तालुक्यातील लघूळ येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून आणले व नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरुन सुजलेगाव येथील सहा तरुणांच्या विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून. तीन आरोपींना अटक करण्यात आली तर तीन आरोपी फरार आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी कि बिलोली तालुक्यातील लघूळ येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून दि. ३१ मे रोजी रात्री पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने दि. १ जुन रोजी बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आणि सुजलेगाव ता. नायगाव येथील हनमत माधव बनकर याने पल्सर मोटारसायकलवरुन माझ्या १३ वर्षाच्या मुलीस काहीतरी फुस लावून पळवून नेल्याचे नमूद केले. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला. दि. ३१ मे रोजी रात्री पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस दि. १ जुन रोजी रात्री उशिरा घुंगराळा येथे सोडले.

मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात नातेवाईक शोध घेत होते पण पळवून नेलेल्या तरुणानेच चोवीस तासानंतर घुंगराळा येथे सोडले. त्यावेळी ती मुलगी घुंगराळा येथे आपल्या बहीणीकडे गेली. तिथे झाल्या प्रकाराबद्दल विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी दि. २ जुन रोजी बिलोली पोलीस ठाणे गाठले व तिथे पिडीत मुलीने पोलीसांना जबाब दिला. यात तिने आपल्यावर सुजलेगाव व नायगाव येथील एका व्यक्तीच्या रुमवर नेवून लैंगिक अत्याचार कल्याचे सांगितले. आणि संबधीतांचे नावेही पोलिसांना सांगितले.

पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरुन हनमंत माधव बनकर, अभिजात प्रल्हाद देवाले, पृथ्वीराज दिगांबर आईलवार, प्रविण लक्ष्मण नेहरु, संदेश इरवंत पवार आणि प्रेम गणेश बोमलवार यांच्या विरोधात 276 व पोस्को गुन्ह्याचे कलम लावण्यात आले. यातील हनमंत बनकर, प्रविण नेहरु आणि संदेश पवार या तिघांना बिलोली पोलिसांनी अटक केली. तर उर्वरीत तिघे फरार होणार यशस्वी झाले. गुन्हा नोंद झाल्यावर आरोपींना अटक करण्याऐवजी तिघांना जाणीवपूर्वक मोकळे सोडले असल्याचा आरोप होत आहे.

फरार आरोपींना अटक करण्यात येवू नये यासाठी काही राजकीय मंडळी हस्तक्षेप करत असून पिडितेच्या कुटुंबीयावर दबाव आणल्या जात असल्याची चर्चा होत आहे.

या प्रकरणातील सहा आरोपी पैकी तिघांना अटक करण्यात आली असून. त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करत आहेत. दिलीप मुंडे, पोलीस उपनिरीक्षक, बिलोली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker