नागणी पुलाजवळ पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन वाळू माफीयांच्या ४८ तासांत कुंडलवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या
◆तेलगंणा राज्यातील निजामाबाद येथून अटक केली

कुंडलवाडी :- महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरील नागणी ते खंडगाव जाणाऱ्या रस्त्यावरील मांजरा नदीच्या पुलाजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुंडलवाडी पोलिसांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून वाळू माफियांकडून जीव घेणा हल्ला झाल्याची घटना दि.८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. या प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या घटनेच्या ४८ तासातच कुंडलवाडी पोलिसांनी आवळल्या असून दोन्ही आरोपींना दि.१० आँगस्ट रोजी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून अटक केली असून या प्रकरणातील इतर आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर मांजरा नदी पात्रात हुनगुंदा व नागणी या शिवारात वाळू माफीयांनी सध्या हैदोस घातला आहे. मांजरा नदीपात्रातून वाळूची ट्रॅक्टर द्वारे नागणीकडे चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून दि.८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ सुनील दस्तके, रघुवीरसिंह चौहान, माधव पाटील, होमगार्ड येप्पुरवार, रामपुरे,जाधव मुजीब शेख, एडके यांच्या पथकांनी नागणी शिवारातील नागणी ते खंडगाव जाणाऱ्या मांजरा नदीच्या पुलाजवळ कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू माफीयांनी ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केला होता.
या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून तीन जण फरार होते. कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोकाँ रघुवीरसिंह चौहान, व्यंकट घोंगडे यांच्या पथकाने आज दि.१० ऑगस्ट रोजी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील बसस्थानक परिसरातून येथून या प्रकरणातील वाळू माफिया आरोपी अंकुश मारुती गादगे (रा.नागणी), ट्रॅक्टरचालक विकास मारुती गादगे (रा.नागणी) या दोघांना अटक केली आहे.



