कुंडलवाडी बंदला १०० टक्के प्रतिसाद
◆ व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ◆ भव्य मशाल रँली

कुंडलवाडी प्रतिनिधी :- शेजारील बांगलादेशात हिंदूवर अत्याचार करण्यात येत आहेत. याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने तसेच दरवर्षी बसस्थानक शेजारी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमामुळे शनिवारी दि.१७ आँगस्ट रोजी कुंडलवाडी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले.
तसेच बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहराचे आराध्य दैवत श्री कुंडलेश्वर मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्यावर सांयकाळी मशाल रँली काढण्यात आली. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. महिला आणि तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंदू राहत असलेल्या वस्त्यांमध्ये जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदू समाजात संतप्त भावना पसरली आहे.
बांगलादेशातहिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने व श्री महालक्ष्मी मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमामुळे शनिवारी दि.१७ आँगस्ट रोजी कुंडलवाडी शहर बंदची हाक देण्यात आली होती. शनिवारी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल, किराणा दुकाने, कापड दुकाने, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स सेंटर,मिठाई दुकाने, कृषी दुकाने, हार्डवेअर, इडली सेंटर्स बंद ठेवण्यात आले.
बंद यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव व शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.