राहेर ते नरसी कावड यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद
कावड यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : श्रावण महिन्याचे औचित्य साधून शनिवारी पहाटे राहेर ते नरसी हर हर महादेव असा जयघोष करत कावड यात्रा काढण्यात आली या कावड यात्रेत शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला. सलग दुसऱ्या वर्षी निघालेल्या अभुतपुर्व कावड यात्रेचे ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर नरसी चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. दुसऱ्यांदा निघालेल्या या कावड यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

नरसी येथील सिद्धेश्वर मंदिरात श्रावण मासाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागीलवर्षी पहिल्यांदाच राहेर ते नरसी अशी २४ कि मी ची कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेत भाविकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज नरसी ते राहेर कावड यात्रा काढण्यात आली. सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीने आयोजित केलेल्या कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून श्रीक्षेत्र राहेरच्या गोदावरी नदी पात्रातील गंगाजलाने शेकडो शिवभक्त नरसी येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करतात.
ही कावड यात्रा वेदशास्त्र संपन्न संदीप महाराज जोशी व मनोज महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे कावड यात्रा राहेर येथे गोदावरी नदीत स्नान करून गंगापुजन व आरती करण्यात आली. यानंतर टाळ मृदंग, हरहर महादेवच्या जयघोष करीत ही कावड यात्रा नरसीकडे निघाली. वाटेत अनेक ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले असून २४ कि.मी. च्या कावड यात्रेची शनिवारी दुपारी सिध्देश्वर मंदिरात सांगता झाली.
राहेर येथील सरपंच साईनाथ पिल्लेवाड यांनी चहा फराळची व्यवस्था केली. मुस्तापुर येथील पत्रकार हाणमंतराव चंदनकर यांनी मोठ्या भक्तिभावाने या कावड यात्रेचे स्वागत केले नरसी येथील विश्रामगृहाजवळ ही पदयात्रा पोहोचताच नरसीकरांनी जोरदार स्वागत केले. नरसी चौकात फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
कावड यात्रेत भाजपचे नेते श्रावण पाटील भिलवंडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे, सुभाष पेरकेवार, साईनाथ अक्कमवाड, अनिल शिरमवार, विठ्ठल चिंद्रावार, बबलु बच्चेवार, नारायण देवशेटवार, संतोष जुक्कलकर, मारोती बुक्के, पवनभाऊ गादेवार, रामायणाचार्य रामकिशन महाराज राजलवाड, नंदेश्वर पा कोरे, भास्कर कोकणे, भीमराव पा भवरे, विठ्ठल चिद्रावार, संतोष जुक्कलकरसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.