ताज्या बातम्यानांदेडनायगांव

खातगावकरांच्या उपस्थिमुळे श्रावण भिलवंडे यांचा वाढदिवस ठरला लक्षवेधी

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : भाजपचे जेष्ठ नेते श्रावण पाटील यांच्या वाढदिवस शुक्रवारी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र या वाढदिवसाला राजकीय कटूता विसरून भास्करराव पाटील खतगावकर यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया तर उंचावल्याच पण वाढदिवसही लक्षवेधी ठरला आहे. खतगावकरांच्या उपस्थितीमुळे मतदारसंघात नवीन राजकीय समिकरणे घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चिखलीकरांचे समर्थक असलेले श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाही विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवस सोहळ्याला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह डॉ.धनाजीराव देशमुख, बालाजी बच्चेवार, मारोतराव कवळे गुरुजी, विजय गंभीरे, अशोक पाटील मुगावकर, शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण साले, बाळू खोमणे, अशोक पाटील वडजे, अमोल पाटील ढगे, बाबाराव पाटील रोकडे, शिवराज पाटील गाडीवान, धनराज शिरोळे, गजानन श्रीमनवार, शैलेश कऱ्हाळे, संजय अंभोरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

जिल्ह्यातील अनेक दिग्गज शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते पण श्रावण भिलवंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी हजेरी लावल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर भिलवंडे व खतगावकर यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली होती. हि कटूता विसरून भास्कर दादांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेली उपस्थिती मतदारसंघात नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडणारी ठरली आहे.

खतगावकरांची उपस्थिती आणि अवघ्या तीन महिण्यावर आलेली विधानसभा निवडणूक याचाही संबंध जोडण्यात येत असून. विशेष म्हणजे खतगावकर हे जिल्ह्यातील जुने जानते नेते आणि अतिशय मुरब्बी राजकारणी समजले जातात. त्यामुळे खतगावकरांनी भिलवंडे यांच्याशी असलेली कटूता विसरुन उपस्थित राहीले म्हणजे या मागे मोठी राजकीय खेळी असावी असा तर्क काढण्यात येत आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजप आमदाराबद्दल प्रचंड नाराजी असून भाजपमधील एक गट विद्यमान आमदराला पुन्हा उमेदवारी नको म्हणून पक्षश्रेष्ठीची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर खातगावकरांची आजची उपस्थिती बरेच काही सांगून जात असली तरी श्रावण भिलवंडे यांचा वाढदिवस आणि दादांची उपस्थिती हा नक्कीच योगायोग नाही अशी जोरदार चर्चा होत आहे.

राजकीय क्षेत्रात एक म्हण आहे ज्या ज्या सभेत शरद पवार भाषण करुन जातात त्यांच्या भाषणाचा अर्थ लावण्यात राजकीय नेत्यांना कित्येक दिवस लागतात. त्याचप्रमाणे भास्करराव पाटील खतगावकरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या उपस्थितीचा अर्थ काढण्यात मतदारसंघातील राजकीय मंडळी लागली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker