ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरात भारतीय जनता पार्टीला धक्का : युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांचा राजीनामा

कुणाल पवारे

कुंडलवाडी : मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय असलेले शहरातील युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राज खांडरे यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर यांच्याकडे दिला आहे. शहरातील युवा नेतृत्व राज खांडरे यांनी आगामी विधानसभा, नगरपरिषद निवडणूकीच्या समोर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाजपला कुंडलवाडी शहरात धक्का बसला आहे.

भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात राज खांडरे यांनी नमूद केले आहे की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आपण भाजपा युवा मोर्चा कुंडलवाडी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती व त्या विश्वासाची जाणीव ठेवून मी माझा परिवार, उद्योग, व्यवसाय व इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देता पूर्णवेळ पक्षाचेच काम करण्याचे व पदाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु पक्षश्रेष्ठीकडून माझ्या छोट्या-मोठ्या कार्याची कसलीही दखल घेतली नाही. या कारणामुळे पक्षावर माझी नाराजी असल्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राज खांडरे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

कुंडलवाडी शहरात भारतीय जनता पार्टीतून एक युवा नेतृत्वाने राजीनामा दिल्याने भारतीय जनता पार्टीला आगामी विधानसभा व काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वी धक्का बसल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker