चार्जिंगच्या दहा बँटऱ्या चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : पंधरा दिवसापूर्वी चार्जिंगच्या दहा बँटऱ्या चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नायगाव पोलिसांना यश आले असून. मुद्देमालसह दोन आरोपींना नायगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नायगाव नरसी रोडवर खैरगावजवळ असलेल्या शहीद ज्ञानोबा टर्के पेट्रोल पंपावरुन (ता.२३) जुलै रोजी रात्री ते २४ जुलै २०२४ च्या पहाटे ५ वाजताच्या दरम्यान अँमरान कंपणीच्या १० चार्जिंगच्या आणि एक छोटी अशा ४२ हजाराच्या चोरी गेल्या होत्या. या प्रकरणी जयंत चिगळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार साई सांगवीकर यांच्याकडे तपास देण्यात आला होता.
या प्रकरणी तपासाच्या दिशा निश्चित केल्यानंतर दोन आरोपींची नावे समोर आली. आरोपींची माहिती मिळताच सांगवीकर यांनी गौस पाशा महमंदसाब वय ३६ वर्ष व शेख वाजीद शेख महेबुब रा. डेअरी फॉर्म, धर्मपुरी जि.निझामाबाद यांच्या मुसक्या आवळल्या. अटक केल्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला दोनच दिवसात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.