ताज्या बातम्यानांदेडनायगांव

डॉ.मिनल खतगावकरांनी जरांगे पाटलांची भेट घेवून मागितला पाठींबा

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या डॉ. मिनल खतगावकर यांनी काल अंतरवली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय घडामोडीवर चर्चा करतांनाच मी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याने मला आपल्या पाठींब्याची गरज आहे आणि आपले समर्थन मिळावे अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे डॉ. खतगावकर यांनी सांगितले.

भाजपा नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मिनल खतगावकर यांनी पक्षाने आमच्यावर अन्याय केला असछन दिलेला शब्द पाळण्यात आला नसल्याने मी नायगाव मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे सांगून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली.

खातगावकरांच्या एकला चलो रे च्या भुमिकेमुळे नायगाव मतदारात चर्चेला उधाण आले. तर दुसरीकडे आ. राजेश पवार यांच्या विरोधकांना खतगावकर यांच्या नायगाव मतदारसंघातील इंट्रीमुळे बळ मिळत आहे त्यामुळे राजेश पवार विरोधकात उत्साह संचारला आहे.

डॉ.मिनल खतगावकर यांनी मतदारसंघात भेटी गाठी घेण्याबरोबरच श्रावण महिण्याचे औचित्य साधून भंडारे आयोजित करत आहेत. या निमित्ताने मतदारांशी संपर्क वाढवला आहे. अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असता काल त्या मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली त्यामुळे त्या मराठा समाजाच्या पहील्या उमेदवार ठरल्या असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्याचबरोबर सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली. या भेटीत मी स्वतः नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे आणि नायगाव मतदारसंघात आपल्या आंदोलनाला मोठा पाठींबाही मिळतो त्यामुळे मला आपल्या पाठींब्याची गरज असून आपला आशिर्वाद असावा अशी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली असल्याचे सांगितले.

जरांगे पाटलांना पाठींबा मागितला असला तरी मी अपक्षच निवडणूक लढवणार असून जरांगे पाटलाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासंदर्भात भास्करराव पाटील खतगावकर हेच निर्ण घेतील असेही त्यांनी सांगितले. डॉ. मिनल खतगावकर यांनी भेट घेवून पाठींबा मागितला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याच असून तसे झाल्यास खतगावकरांचे नायगाव मतदारसंघातील पारडे भाजपला जड होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker