ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी मिलिंद नरबाग यांच्या पदोन्नती बद्दल सत्कार

कुंडलवाडी प्रतिनिधी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मिलिंद नरबाग यांची नुकतीच जमादारपदी पदोन्नती झाल्याने १५ आँगस्ट रोजी पोलीस ठाण्यात ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर त्यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी मिलिंद नरबाग यांच्या गणवेशाला पदोन्नतीचे फीत लावून गौरव करण्यात आला.
यावेळी पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ माधव पाटील, पोहेकाँ पी.आर.मेडेवार, पोहेकाँ अरुणा श्रीवास्तव, इद्रिस बेग, गणपत गंधकवाड, सुनील बास्टेवाड, संजय चापलवार, रघुवीरसिंह चौहान, अमर शिंदे, फैय्याज बेग, रामचंद्र पंचलिग,रवी देशमुख, रामेश्वर पाटील, महिला पोलीस कर्मचारी दिपाली बागुलवाड, शेख शाहीन यावेळी उपस्थित होते.