ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

काँग्रेसचे संघटन बळकट करण्यासाठी ‘नांदेड पॅटर्न’ ; सुरेशदादा गायकवाड यांची राष्ट्रीय समन्वयकपदी वर्णी

प्रकाश महिपाळे

नांदेड :- नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीतील एक खंबीर नाव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व मा. सुरेशदादा गायकवाड यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अनुसूचित जाती विभागाच्या ‘राष्ट्रीय समन्वयक’ पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरेशदादा गायकवाड यांनी गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडले आहेत. त्यांची अभ्यासू वृत्ती, संघटन कौशल्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड झाल्यामुळे आता सुरेशदादा गायकवाड यांना देशपातळीवर पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीच्या मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे बोलले जात आहे.

या निवडीबद्दल बोलताना सुरेशदादा गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून, “दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वसामान्य जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू,” असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker