ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या संस्थेच्या पाठीशी चव्हाण कुटुंब कायम खंबीर : खा.रविंद्र पाटील चव्हाण

​ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

प्रकाश महिपाळे

नायगाव :- नायगाव येथील शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या ‘ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल’च्या नव्या भव्य आणि अत्याधुनिक इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात अन् दिमाखदार वातावरणात पार पडला. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांच्या शुभहस्ते नूतन शाळा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण पार पडले. या सोहळ्याला परिसरातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माधव आप्पा बेळगे, हणमंतराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण (उपनगराध्यक्ष), राजेश देशमुख कुंटूरकर, मोहनराव पाटील धुपेकर, सय्यद रहीम सेठ, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे, राजू पाटील भिलवंडे, पंकज पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, रवींद्र भालेराव, नारायण पाटील जाधव, शिवाजी पाटील कल्याण, विठ्ठल बेळगे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चव्हाण कुटुंब संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील…
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार रविंद्र पाटील चव्हाण म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल’ने केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. या शाळेच्या उभारणीत हरिबाबू सर आणि मुख्याध्यापिका लक्ष्मी मॅडम यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी निष्ठेने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महान कार्य केले आहे. चव्हाण कुटुंबीय या शैक्षणिक संस्थेच्या पाठीशी भविष्यातही कायम खंबीरपणे उभे राहील.”

ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही नवी इमारत आणि सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली. या सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांनी आणि नागरिकांनी शाळेच्या या नव्या टप्प्याबद्दल संस्थाचालक, शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker