ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून नांदेडमध्ये अभिवादन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड:- साहित्यातून आणि लोककलेतून समाजप्रबोधनाची धुरा सांभाळणारे महान लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरंजली आणि अभिवादन करण्यात आले.

नांदेड येथील डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी पक्षाच्या नेत्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख पदाधिकारी: भगवानराव पाटील आलेगांवकर (नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष), तातेराव पाटील आलेगांवकर (शहर जिल्हा उपाध्यक्ष), धनंजय सूर्यवंशी (युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष), लक्ष्मण भवरे (किसान सभेचे मा. प्रदेश प्रतिनिधी), प्रकाश मुराळकर (माजी नगरसेवक), नाना पोहरे (संचालक, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती), दिगांबर पोपळे (चेअरमन, लिंबगाव), इंजी. सुभाष रावणगांवकर (ग्रामीण जिल्हा सरचिटणीस), युनूसखान (शहर जिल्हा सरचिटणीस), मारोती चिवळीकर (शहर जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), शफी उर रहेमान (शहर जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल), गंगाधर महाजन (शहर जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल), पांडुरंग क्षीरसागर (युवक ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष).

याशिवाय अमित कांबळे, माणिक बोडके, संदीप कदम, विशाल पोकळे, गजानन गोरख, विठ्ठल कळके, बाबूराव जोगदंड यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker