गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

सुजलेगाव येथे कै.मोहनरावजी देशमुख हायस्कूलमध्ये ओपन जिमचे उत्साहात उद्घाटन

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत, कै. मोहनरावजी देशमुख हायस्कूल, सुजलेगाव येथे राज्यसभा खासदार डॉ.अजितजी गोपछडे यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिम’चे भव्य उद्घाटन दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडले. या ओपन जिमचे उद्घाटन प्राचार्य सौ.अनिताताई गोपछडे, माजी मुख्याध्यापक व्ही.एस.नकाते सर आणि व्ही.एम.अनेराये सर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

ONGC CSR उपक्रमाअंतर्गत वित्तीय वर्ष २०२६-२७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी ‘ओपन जिम’ उपक्रम राबविला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून सुजलेगाव येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक व्यायाम साहित्यांनी सज्ज ओपन जिम उभारण्यात आली आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य सौ. अनिताताई गोपछडे यांनी सांगितले की, “अभ्यासाइतकाच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्यायामही अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांनी निरोगी राहण्यासाठी टीव्ही व मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळांवर भर दिला पाहिजे, तरच ‘स्वस्थ शरीर, सशक्त भारत’ हे स्वप्न साकार होईल.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात माजी मुख्याध्यापक व्ही. एस. नकाते सरांनी खासदार डॉ. अजित गोपछडे व प्राचार्य सौ. अनिताताई गोपछडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले. त्यानंतर मुख्याध्यापक व्ही. एम. अनेराये सरांनी खासदार महोदयांचे आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालनश्री. बालाजी गोपछडे यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक होकर्णे सर, पवार सर, गिरी सर, आनंद नकाते सर, प्रकाश सोनटक्के सर, प्रशांत पाटील सर, गणेश धर्माजे सर, चक्रधर कदम सर, सुरज काळेवार सर तसेच बापूराव अडकीने, मोहमद फयाज, व्यंकट अडकीने व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!