संजीवनी संस्थेतर्फे मातीचे किल्ले बांधण्याची स्पर्धा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, अंधेरी, मुंबई यांच्या वतीने ‘दीपावली मातीचे किल्ले बांधणे स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. “चला तर मग किल्ला बनवूया…! मातीशी नाते जोडू या…!!” असे आवाहन संस्थेने केले आहे. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी २,२२२ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १,१११ रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ७७७ रुपये व चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन उत्तेजनार्थ चषकही दिले जाणार आहेत. संस्थेची घोषवाक्ये आहेत, “एक हात मातीचा, आपल्या माणसांचा, आपल्या माणसांसाठी!” आणि “फेकला तर दगड, रचला तर किल्ला.”
संस्थेचे अध्यक्ष गणेश निकम, सचिव आनंदराव जाधव, खजिनदार मोहन दाबेकर, उपाध्यक्ष जगदीश कुवळेकर, सहसचिव दिलीप सपकाळ, सहखजिनदार तुकाराम सणस, कार्याध्यक्ष सुनील प्रभू आणि सहकार्याध्यक्ष संदेश भावे आहेत. संस्थेचे सदस्य दिपक राणे, प्रसाद घरत, दिनकर खरात आणि किसन बाकाडे आहेत. महिला सदस्य सुवर्ण खिडबिडे, महिला संघटक कांचन तेली, तसेच संघटक राजेंद्र हापटे, सुभाष सकपाळ, जितेंद्र जुनघरे, निलेश बाकाडे आणि अर्चना पांचाळ यांचाही संस्थेच्या कार्यात सहभाग आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसह इतर इच्छुक Instagram वापरकर्त्यांसाठीही विशेष संधी जाहीर करण्यात आली आहे. @Sanjeevani.ngo2021 या पेजवरील उत्कृष्ट Best Collaboration Reel साठी ५५५ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी या पेजला भेट देता येईल. आयोजकांशी संपर्क साधण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेश निकम यांचा दूरध्वनी क्रमांक ९२२३९४९७२७ आहे. संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वांना दसरा आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



