शेतकऱ्यांना 24 तास थ्रिफेस वीज मिळाली पाहिजे यासाठी २८ रोजी राज्य महामार्गावर ; आदमपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन

मोरे मनोहर
किनाळा :- निसर्गाच्या अपुऱ्या पावसामुळे देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतीबरोबरच गुरांच्या पाणी व वैरणाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर असताना वीज मंडळाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याने संतप्त देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता नांदेड देगलूर राज्य महामार्गावरील आदमपूर फाटा येथे शेतकऱ्यांना 24 तास थ्रिफेस वीज मिळाली पाहिजे यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बिलोली-देगलुर तालुक्यात यंदा निसर्गाच्या अवकर्पेमुळे अतिअल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील खरिपाची सर्व पिके पावसाअभावी वाया गेली, कुठल्याही नदी नाल्यांना पाणी नसल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना या भागात मोठ्या प्रमाणात रब्बी पिक घेता येऊ शकते परंतु बीज मंडळाच्या मनमानी व गैरकारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी व गुरांना लागणारे शेतात वैतरण पेरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची मुबलक सुविधा असुन देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
बिलोली देगलूर तालुक्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे कुठल्याही नदी नाल्यांना किंवा कोणत्याही गावातील तलावात जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ऑक्टोंबर मध्येच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने भर उन्हाळ्यात गुरांना चारा व पाणी मिळेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यासमोर असताना उन्हाळ्यात चाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी शेतकरी शेतात गुरांसाठी चाऱ्याची लागवड करण्याचा आणि येणारा रब्बी हंगामाची पेरणी करण्याचा प्रयत्न करत असताना वीज मंडळाकडून मात्र शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याने शेतकरी वैतागला आहे.
बिलोली देगलूर परिसरात निसर्गाच्या अवकर्पेमुळे खरीपाची पिके वाया गेले असले तरी रब्बीचा हंगामात ज्वारी, गहू ,हरभरा, करडई आदिसह विविध पिके चांगली घेता आली तर गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न तरी सुटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांना 24 तास थ्रिफेस वीज पुरवठा सुरळीतपणे राहिला तर या दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रब्बी पिकांची पेरणी व वैरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो यासाठी शेतकऱ्यांना किमान 24 तास थ्रिफेस वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवावे यासाठी वारंवार विज मंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती करुनही शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी वैतागला आहे.
शेतकरी नैसर्गिक संकटात असताना शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत मिळणे गरजेचे होते परंतु अद्याप तरी शासनाकडून शेतकऱ्यांना कसलीही मदत करण्यात आली नाही यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर असताना शेतकऱ्यांना जर सुरळीत वीज पुरवठा केला तर शेतकरी व जनावरांच्या वैरनाचा प्रश्न सुटेल यासाठी शेतकऱ्यांना 24 तास थ्रिफेस वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावे यासाठी बिलोली- देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने नांदेड देगलूर राज्य महामार्गावरील आदमपूर फाटा येथे दि.28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेआहे.



