ताज्या बातम्यानांदेडबिलोली

श्रीजयाताई चव्हाण यांनी आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यांचे राखी बांधून केले औक्षण

मोरे मनोहर

किनाळा :- बंध हा नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा! “नात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यानी अधिक समृद्ध करणारा सण रक्षाबंधन” रक्षाबंधनानिमित्त जितेशभाऊ अंतापुरकर यांच्या मोठ्या भगिनी सौ. संतोषीताई केसराळीकर यांच्या निवासस्थानी लाडकी बहीण श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी बिलोली- देगलुर विधानसभेचे विद्यमान आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यांना राखी बांधून जितेश अंतापुरकर यांचे औक्षण केले.

राजकारणात अनेक वेळा कधीच कोणी कोणाचे राहत नाहीत परंतु मानलेले नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतात असेच मानलेले नाते राजाचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि कैलासवासी रावसाहेब अंतापुरकर यांचे होते कैलासवासी रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर अशोकरावजी चव्हाण यांनी त्यांच्या ह्या नात्याला कुठेही तडा न जाऊ देता त्यांचे सुपुत्र जितेश भाऊ अंतापुरकर यांना बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करुन आमदार केले.

नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या विकासासाठी अशोकरावजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम ठोकून भाजपात गेले मात्र जिथेश अंतापुरकर त्यांच्यासोबत भाजपात न जाता काँग्रेसमध्येच राहिलेले असताना काँग्रेस पक्षांनी जिथे समतापुरकर वर क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी मानलेले नाते तुटू न देता बिलोली देगलूर विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांची रक्षाबंधनानिमित्त भेट घेऊन राखी बांधून केलेले औक्षण कदाचित भावानी भाजपात यावे यासाठी असेल तर भाऊही बहिणीचे ऐकून भाजपात जाणार की बहिणीचेही न ऐकता ते पुन्हा काँग्रेसमध्येच राहणार आकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker