ताज्या बातम्यानांदेडबिलोली

हुतात्मा पानसरे महाविद्यालय भरती प्रकरण : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

अंकुशकुमार देगावकर

नांदेड :- हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कुंडलवाडी संचलित हुतात्मा पानसरे महाविद्यालयात भरतीसाठी होणाऱ्या मुलाखती रद्द करण्यासाठी च्या मागणी नंतर विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करून विनाविलंब कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे आणि हु.पानसरे महाविद्यालय अर्जापूरच्या व्यवस्थापन समिती सदस्य श्रीनिवास सब्बनवार यांनी आवाज उठवला होता. बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथील हुतात्मा पानसरे महाविद्यालयात काही पदासाठी भरती चालू आहे.

मुळातच भरतीसाठी मुलाखती घेणारे हेच बेकायदेशीर आहेत कारण सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांच्याकडे सदर प्रकरणी वाद प्रलंबित आहे. आर्थिक व्यवहारापोटी भरतीचे हे प्रकरण चालू आहे त्यामुळेच अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालका कडे याबाबत तक्रार केली होती.

त्याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणात नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker