ताज्या बातम्यानांदेडबिलोली

तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये गोदावरी मनार पब्लिक स्कूलची विविध स्पर्धेमध्ये बाजी.!

मोरे मनोहर

किनाळा :- पंचायत समिती बिलोली क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तालुकास्तरीय विविध स्पर्धेत शंकरनगर तालुका बिलोली येथील इंग्रजी माध्यमाच्या गोदावरी मनार पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत बाजी मारली असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून या विद्यार्थ्यांने माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डी.पी.पांडेय व तालुका क्रीडा संयोजक नंदू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये जवळपास १५ शाळेच्या संघांनी सहभाग नोंदविला त्यात अनेक सामने चुरशीचे झाले अंतिम सामना आंतरभारती विद्यालय बिलोली व गोदावरी मनार पब्लीक स्कूल यांच्यात चुरशीची लढत झाली व गोदावरी मनार पब्लीक स्कूलच्या संघांनी विजय मिळवला.

तर सगरोळी येथे (वयोगट १७,१९ मुले ), वयोगट १४,१७,१९ मुली ) या वयोगटातील संघाने व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वयोग तरट १९ वयोगटातील मुले व मुलींच्या अशा दोन्ही संघांनी विजय मिळविला. कबड्डी स्पर्धेत येथील शाळेतील मुलांच्या सर्व वयोगटातील संघांनी विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले.

जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र ठरलेल्या विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष मा.खा.श्री.भास्कररावजी पाटील खतगावकर , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, बाळासाहेब पा.खतगावकर, सचिव डॉक्टर मीनलताई निरंजन पा.खतगावकर, प्राचार्य डी.पी.पांडेय यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker