गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

MBBS प्रवेशासाठी हवा ओम आडकीनेला आपल्या मदतीचा हात

प्रवेश शुल्क भरण्याची आर्थिक परिस्तिती नसल्यामुळे ओमचे स्वप्न भंगण्याची भिती

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे पहिल्या यादीत सेमी गव्हरमेंट मधून प्रवेशासाठी पात्र ठरूनही पुढील दोन दिवसात सात लाख रुपयांची व्यवस्था करू न शकल्यास ओम आडकीनेच्या MBBS प्रवेशाचे स्वप्न भंगण्याची भिती ओमच्या पालकाने जड अंतकरणाने व्यक्त केली आहे. पालकाकडून आर्थिक मदतीचे सर्वांना नम्र आवाहन करण्यात आले आहे.

नीट परीक्षेत 613 गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले असले तरी यावर्षीच्या वाढत्या कट ऑफ मुळे 613 गुणाला गव्हरमेंट कॉलेजमध्ये मिळू शकले नाही. सेमी गव्हरमेंट मध्ये प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश घेण्याची आर्थिक परिस्तिती नसल्यामुळे ओमच्या वडील सुरेश आडकीने यांनी मदतीचे नम्रपणे आवाहन केले आहे.

ओमला पुढील दोन दिवसांमध्ये सात लाख रुपये रक्कम जमा करावयाची आहे परंतु त्याच्याकडे सध्या फक्त दोन लाख रुपये जमा झाले आहेत उर्वरित रक्कम जमा न झाल्यास जिद्दीने अभ्यास करणाऱ्या ओमच्या मेडिकल प्रवेशाची संधी हुकू नये याकरीता पुढील अकाउंट नंबर हा ओम सुरेश अडकिणे याचा असून आपण अकाउंट नंबर वर स्वछेने आर्थिक मदत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ओम सुरेश आडकीने फोन पे नंबर 9373106167 / ACCOUNT NUMBER 41565127565
STATE BANK OF INDIA Branch Code
16667, IFSC CODE- SBIN0016667
दानशूर व्यक्तींनी मदत करावी असते आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker