क्राईमगावाकडच्या बातम्यानायगांव

कुंटूर ठाण्याच्या घरासमोरील घराच्या दारात बांधलेली मेंढीची चोरी ■ कुंटूर ठाणेदारांचे दुर्लक्ष, चोरीचे तपास लागेना

■ चोरीच्या घटना आनेक वेळा पोलिसांचा मात्र काना डोळा

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- नायगाव तालुक्यातील कुंटूर गावात पोलीस ठाण्याच्या कांही अंतरावर असलेल्या जळबा गुंठे यांच्या दारात बांधलेली अंदाजे १४००० हजार रुपये किंमतीची मेंढी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास चोरीला गेली असल्याने कुंटूर पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरोधात गुरन १७३/२४ चे कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता बी.एन.एस.२०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटूर ठाणेदारांचे दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केल्या जात असून वाढत्या चोरीचे प्रकरणाला जवाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी जोर धरत आहे.

सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील रहिवासी असलेला जळबा गुंठे यांचा शेळी व मेढी पालनाचा व्यवसाय आहे .हा व्यवसाय करूनच ते कुंटुबाचा उदरनिर्वाह करतात. दि १ सप्टेंबर २०२४ रोजी मेढी विल्याने मेंढी व तिचे कोकरु त्याने घरी आनुन बांधून जेवन करुन मेंढ्या व शेळ्या चारण्यासाठी शेताकडे गेला मग तो सायकांळी ७ वाजता घरी आला तेंव्हा त्याला कोकरू घरी दिसले मात्र मेंढी दिसत नसल्यामुळे तो आजुबाजुला शोध घेतला मात्र मेंढी कुठेही दिसून आली नाही.

तेंव्हा त्याने गावातील उत्तम चांदु माहदाळे ( मूक बधिर) असल्याने बोलता येत नाही. यांनी हातवारे इशारे करुन कोणीतरी खाद्यावर मेंढी घेवुन गेल्याचे सांगितले. तो माझ्या सोबत येवून मला मेंढी नेलेला व्यक्तीकडे हात करून दाखविला असे सांगितले. तेंव्हा एक कुंटूर येथील दुसरा परडवाडी येथील असल्याचे कळल्याने कुंटूर पोलीसांत दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी पकडून दिलेले चोर केले पोलिसांच्या स्वाधीन.

चोरीच्या घटना आनेक वेळा पोलिसांचा मात्र काना डोळा…मेंढी चोरीचे व इतर चोरीच्या घटना कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वेळा घडतात पण त्याचा तपास म्हणावा तसा लागत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत चालले असून चोरीच्या घटना आनेक वेळा, पोलिसांचा मात्र काना डोळा होत असल्यामुळे या सर्व विषयाला कुंटुर ठाण्याचे पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक व अधिकारी व जमादार जवाबदार असून वरिष्ठ आधिकारी यांनी याकडे लक्ष घालुन चोरांना पाठीशी घालणारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मेंढपाळ बधवातून केली जात आहे.

तीव्र शब्दात निषेध… आमच्या प्रतिनिधी यांनी जळबाजी गुंठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांच्या दुर्लक्षित पणामुळेच चोऱ्या होत असल्याचा आरोप केला असून या घटनेचा त्यानी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

■चोरांचा तपास लागेना…

या पूर्वीच्या चोरीच्या घटना त्याचा तपास मात्र लागेना या पूर्वीची कोकलेगाव शिवारामध्ये रोडवर पलटी झालेल्या ट्रक मधील तब्बल 500 पोते चणाडाळ चोरट्याने गायब केली तपास मात्र गुलदस्त्यात, दुसऱ्या चोरीत कुंटूर गावात मुख्य चौकात असलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चार दिवसाखाली फोडली.

या पूर्वी कुंटूर मध्ये चार घरे व एक किराणा दुकान फोडुन एक लाख 37 हजाराचा माल, सोन्याचा ऐवज लंपास केल्याच्या गुण्याचा पोलिसांना तपास काही केल्या लागेना. मेंढ्या चोरी गेल्याची नोंद कुंटूर पोलीस स्टेशनला असतानाही त्याचा तपास लागेना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker