गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

घोषणा होवून एक महिना झाला तरी ‘आनंदाचा शिधा’ पोहचला नाही : लाभार्थी प्रतिक्षेत

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : सनासुदीच्या दिवसात नायगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. तालुक्यातील ३३ हजार ६०७ कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी साहित्य आहे. आता गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वितरण केला जाणार आहे. मात्र अद्यापही आनंदाचा शिधा नायगावपर्यत पोहचला नाही.

‘आनंदाचा शिधा’ सणासुदीच्या दिवसात महागाईची झळ गोरगरीब कुटुंबाना पोहोचू नये, यासाठी रेशन दुकानातून अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार असल्याची घोषणा एक महिण्यापुर्वी शासनाने केली होती. यावर्षी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळाला होता. आता गौरी, गणपतीच्या निमित्ताने सवलतीच्या दरामध्ये रवा, साखर, चणाडाळ व सोयाबीन तेल दिले जाणाईल असे घोषित केले होते. गौरी गणपती सणानिमित्त अंत्योदय व प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयात मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रखा, एक किलो साखर, तेल, एक किलो चणाडाळ आदी वस्तू मिळणार आहेत.

गौरी गणपतीनिमित्त १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. नायगाव तालुक्यातील ३३ हजार ६०७ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. यात ३७०३ अंत्योदय शिधापत्रिकाधारक, २६१०६ प्राधान्य कुटूंब तर ३७९९ शेतकरी कुटुंब आहेत.

आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी (ता.२१) आँगष्ट रोजी जिल्हा पुरवठा दारास कळविले आहे. गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र रास्त धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा पोहोचू शकलेला नाही. अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रेशन दुकानामधून ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची घोषणा करून एक महिना होत आला, मात्र चणाडाळ, पामतेल यापैकी साखर आणि रवा काहीही उपलब्ध झाले नाही.त्यामुळे आनंदाचा शिधा मिळणार कसा, असा प्रश्न तालुक्यातील लाभार्थी करू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker