गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

अमजद पठाण यांच्यावतीने शंकरनगर येथील शिवबाल गणेश मंडळास श्री गणेशाची मूर्ती

मोरे मनोहर
किनाळा :- हिंदू मुस्लिम भाई भाई हा संदेश देणारा शंकरनगर तालुका बिलोली येथील शिवबाल गणेश मंडळ असून या गणेश मंडळात अनेक समाजातील बाल मित्र एकत्र येऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना करण्याचे ठरवले असता या शिवबाल गणेश मंडळास मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते अमजद शादुलसाब पठाण यांनी श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून दिले असून हा एक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एकमेव बाल गणेश मंडळ असल्याची त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे.

सविस्तर माहिती अशी की रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या 39 गावात सुमारे 60 श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून अनेक गावात एक गाव एक गणपती बसवण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले असून गल्लोगल्ली बसवण्यात येणारे गणपती कमी करून सर्वांनुमते सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात अनेकांनी पुढाकार घेऊन गावात कमीत कमी गणपती मंडळाची स्थापना करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात आले.
शंकरनगर तालुका बिलोली येथे शिवबाल गणेश मंडळांनी सामाजिक एकतेचा संदेश देत अनेक जाती-धर्मातील चिमुकले बाल मित्र एकत्र येऊन शंकरनगर येथील बाजारपेठेत श्री गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

आणि त्यानुसार लोकवर्गणी चिमुकल्याणी गोळा करत असताना शंकरनगर येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते अमजद शादुलसाब पठाण यांनी मोलाचा वाटा घेत शिवबाल गणेश मंडळास बसवण्यासाठी लागणारी श्री गणेशाची 3300 रुपये किमतीची मूर्ती घेऊन दिल्याने सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा त्यांचा निर्णय असून श्री गणेशाच्या नऊ दिवस चालणाऱ्या या सण उत्सवाच्या काळातच मुस्लिम समाज बांधवांचा ईद-ए-मिलादु हा कार्यक्रम सोळा तारखेला येत असल्याने या कार्यक्रमाचा गणेश मंडळाला कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी ईद-ए-मिलादचा 16 तारखेचा कार्यक्रम पाच दिवस पुढे घेण्याचे ठरविले असल्याने त्यांच्या या सामाजिक एकतेच्या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker