गणेशोत्सव काळात होणारा ईद- ए-मिलाद सण पुढे ढकलला ◆ २१ तारखेला साजरा होणार
◆ कुंडलवाडी पोलीस व मुस्लिम बांधवांच्या बैठकीत निर्णय

कुंडलवाडी :- गणेशोत्सव काळातच ईद-ए-मिलाद हा सण आल्यामुळे पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी पोलिसांनी मुस्लिम समाज बांधवांची सात सप्टेंबर रोजी ठाण्यात बैठक बोलावली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय कुंडलवाडी येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळातच ईद-ए- मिलाद हा सण आल्यामुळे पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले होते.त्यासाठी कुंडलवाडी पोलिस ठाण्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, ईद-ए-मिलाद -उन-नबी कमिटीचे अध्यक्ष मैनोद्दीन शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवांची दि.७ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी दोन्ही सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिसांकडून केले गेले.
या आव्हानास मुस्लिम समाज बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत ईद-ए-मिलाद कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी साजरा करणार असल्याचे जाहीर केले.या निर्णयाच्या माध्यमातून कुंडलवाडी च्या मुस्लिम बांधवांनी धार्मिक सलोख्याचे एक नवे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
या बैठकीस ईद-ए-मिलाद-उन- नबी कमिटीचे अध्यक्ष मैनोद्दीन हाजीसाब शेख,उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेठ खाजामियाँ, शहरातील चारही मज्जिद चे सदर व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.