ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गडगा शिवारातून हरवलेल्या दुभत्या म्हशीचा पंधरा दिवसांपासून शोध लागेना

अंकुशकुमार देगावकर

गडगा : नायगाव तालुक्यातील गडगा शिवारातून चरण्यासाठी गेलेली दुभती म्हैस अचानकपणे भरदिवसा हरवली होती. गेल्या १६ दिवसांपासून म्हशीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु अजूनही म्हशीचा शोध लागला नाही. एकीकडे मुक्या प्राण्यांची आई दुध पाजविण्यासाठी दिसत नसल्याने म्हशीचे (लेकरू) वगार व्याकूळ झाली आहे.

गडगा येथील शेतकरी बालाजी भास्कर पवळे या शेतकऱ्याची अंदाजित ६० हजार रुपये किंमतीची दुभती म्हैस गावालगतच्या शिवारातून २० डिसेंबर रोजी शेतात चरायला सोडल्यानंतर सकाळी पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गायब झाली. म्हैस दिसत नसल्याने संबंधित शेतकरी त्यांचे कुटुंबीय शोधासाठी गेल्या सोळा दिवसांपासून रानोमाळ पिंजून काढत आहे. आज नाही तर उद्या सापडेल या आशेने म्हशीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दररोज आईचे दुध पिणारे दिड महीन्याचे वासरू वगार हे आईसाठी व्याकूळ होऊन हंबरू लागले आहे. या म्हशीचा शोध लावून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांने दिले आहे. अनेक व्हाट्सअप ग्रुपमध्ये संदेश पाठवून म्हशीचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker