ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी हराळे यांच्या मध्यस्थीने किनाळचा उद्याचा रस्तारोको 21 रोजी

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड- देगलूर राज्य महामार्गावर किनाळा येथे उद्या 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी गावकऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन सदरील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझ्याकडून योग्य ती मदत आपणास केल्या जाईल यासाठी उद्याचे आंदोलन मागे घेऊन मला आपण चार दिवसाचा वेळ द्यावा मी यासंबंधी योग्य ती मदत करेन असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असता त्यांच्या या मध्यस्थीने तूर्तास हे उद्याचे आंदोलन चार दिवस पुढे ढकलण्यात आले असून न्याय न मिळाल्यास हेच आंदोलन येत्या 21 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

किनाळा तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नाल्यांना पूर येऊन पिकासह जमिनी खरडून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या नाल्या लगत असलेल्या विहिरीत पुराची गाळ पडून विहिरीही बुजल्या यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने किनाळा तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांनी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नांदेड देगलूर राज्य महामार्गावर किनाळा येते रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाला सोडवण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विक्रम हराळे यांनी दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावात शांतता समितीची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मला फक्त चार दिवसाची वेळ द्या अशी विनंती केल्याने येथील शेतकऱ्यांनी हराळे यांच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन तूर्तास मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास 21 नोव्हेंबर रोजी हेच रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी किनाळा येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीस गावातील असंख्य शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी आमच्या शेतीच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची साधी विचारपूस करण्यासाठी देखील आज पर्यंत कोणता राजकीय नेता आला नाही की प्रशासकीय अधिकारी आला नाही त्यामुळे आमचे दुःख समजून घेण्यासाठी आलेले सपोनी हराळे यांच्या मध्यस्थीने त्यांना चार दिवसाचा अवधी देणे योग्य राहील अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका झाल्याने हे आंदोलन तूर्तास मागे घेऊन न्याय न मिळाल्यास हेच रस्ता रोको आंदोलन तीव्र करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी हराळे यांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker