चिंचोली येथे तरुणाचा खून आरोपी ताब्यात…

बालासाहेब शिंदे
मारतळा :- लोहा तालुक्यातील चिंचोली शिवारात पैशे देण्या-घेण्याच्या वादातून एका ऊस तोड मजूर तरुणाचा अत्यंत निर्दयीपणे गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करून निघृण खून करण्यात आला हि घटना दि. १ एप्रिल मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर खून प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उस्माननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे चिंचोली ता. लोहा येथे आपल्या नातेवाईकाकडे गेल्या चार दिवसांपासून मुक्कामी असलेला दादाराव आनंदा हंबर्डे (वय २६) वर्ष, रा.पाटोदा ता. नायगाव हा ऊसतोड मजूर म्हणून काम करत होता त्या तरुणाचा दि.१ एप्रिल मंगळवारी चिंचोली गावच्या पूर्व दिशेला किशन अडकिने यांच्या उसाच्या शेतात धारधार कत्तीने अत्यंत निर्दयीपणे गळ्यावर सपासप वार करून दुपारी दोनच्या दरम्यान दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली.
विशेष म्हणजे खून करणारा दिनेश व्यंकटी शिंदे (वय २२ वर्ष) मुक्काम चिंचोली ता. लोहा हातरुण मी स्वतः दादाराव हंबर्डे याचा खून केला आहे, असे सांगत गावात आला. नंतर गावातून पसार झाला. ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, फौजदार गजानन गाडेकर जमादार अशोक हंबर्डे दाखल झाले इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
दरम्यान या खून प्रकरणातील आरोपी दिनेश शिंदे हा मारतळा येथील आठवडी बाजारात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केले. फिर्यादी आनंदा दाजीबा हंबर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पार्थिवावर पाटोदा येथे दि.२ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.