नायगाव तालुक्यातील 80 गावचे आरक्षण जाहीर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार 25 एप्रिल रोजी जाहीर झाली आहे. भावी सरपंच, विध्यमान सरपंच तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत होते. 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान नायगाव तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
नायगाव तहसील प्रांगणात शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता सोडत कार्यक्रम जाहीर झाला.
नायगाव खै.तहसिलसाठी नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनात प्राधिकृत अधिकारी तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता तहसीलदार यांच्या प्रांगणात पार पडला.
नायगाव तालुक्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे अनु जाती सर्वसाधारण तलबिड, राजनगर, कोठाळा, पिंपळगाव, मुस्तापूर, गोदमगाव, सोमठाणा, खंडगाव (अ.जाती महिला) मुगाव /मुगाव तांडा, कहाळा बु., वंजरवाडी, चारवाडी, टाकळी त.ब., मरवाळी तांडा, खैरगाव, निळेगव्हाण व धुप्पा. अनु.जमाती सर्वसाधारण मरवाळी-कोपरा व रातोळी, महिला – होटाळा व रुई खु.
इतर मागासवर्गीय – परडवाडी, कुंटूर, टाकळी बु., इकळीमाळ,केदारवडगाव, सावरखेड, इज्जतगाव, औराळा व मनूर. महिला – सातेगाव,धनज, ईकळीमोर, शेळगाव छत्री, हिप्परगा जा, पळसगाव, टाकळगाव, सुजलेगाव, बरबडा, राहेर व नरसी. खुला सर्वसाधारण – टाकळी त.मा., धानोरा त.म., घुंगराळा, कहाळा खु, सालेगाव, कांडाळा, मोकासदरा, कोकलेगाव कोलंबी, गडगा, पाटोदा त.ब., मांजरम, कुष्णूर, कार्ला त.मा., हंगरगा, लालवंडी, ताकबिड, बेटकबिलोली, सांगवी व डोंगरगाव.
महिला -हुस्सा, नरंगल, मांडणी, नावंदी, वजिरगाव,रानसुगाव, अंचोली, बेंद्री, अंतरगाव, टेंभुर्णी, कुंचेली, गोळेगाव, आलुवडगाव, शेळगाव गौरी, रुई बु., देगाव, मेळगाव, भोपाळ, बळेगाव व दरेगाव.