अमरनाथ यात्रेकरूंचा नरसीत सत्कार खंडोबा मंदीरात महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

सुभाष पेरकेवार
नरसीफाटा :-भाजपचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे अमरनाथ यात्रा करुन आलेल्यांचा नरसीकरांच्या वतीने काल सोमवारी सत्कार करण्यात आला. यात्रेकरुंच्या वतीने खंडोबा मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभही नरसीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला.

अमरनाथ यात्रेला दरवर्षी भारतातून लाखो भाविक जातात ही यात्रा अतिशय खडतर आहे. यंदा नरसीतील भाजपचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार, भिमराव पाटील भवरे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर कोकणे, राष्ट्रवादी चे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग बागडे, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर कोकणे, हाणमंतराव मांजरमे, परमेश्वर लोहगावे, अदिंचा सहभाग होता.
यात्रा सुरूवात झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तब्बल 14 किमी पायी प्रवास करुन अमरनाथ येथील पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेतले. याबरोबरच वैष्णवी देवी यात्रा संपन्न करण्यात आली.
यात्रा यशस्वी संपन्न झाल्यानंतर यात्रेकरूंच्या वतीने संयुक्त पणे महाप्रसादाचा कार्यक्रम येथील खंडोबा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. सराफा दुकानचे मालक वैजनाथ लोहगावे यांनी यात्रेकरूंना दस्ती टोपी करून सन्मान केला. सौ.विजयमाला सुभाष शिरगीरे यांनी यात्रेकरूंना साडी दस्ती टोपी देऊन सन्मान केले.
यासह शिक्षक मनोहर वडगावे, शेख खालीद, संतोष भवरे, खाकिबा मांजरमे, भाधव मेकाले आदींनी यात्रेकरूंना दस्ती टोपी देऊन सत्कार केला.