गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या पांचाळ कुटुंबाला अमित भाऊ बोंडले मित्र मंडळाचा आधार; ₹३५,००0 ची रोख मदत सुपूर्द

नायगाव (दिपक गजभारे): घुंगराळा येथील तरुण गायक व वादक स्व. श्रीधर पांचाळ यांच्या अकाली निधनामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत सापडलेल्या त्यांच्या कुटुंबाला युवा उद्योजक अमित भाऊ बोंडले मित्र मंडळाने मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत अमित भाऊ बोंडले आणि साहेबराव पाटील सुगावे यांनी पुढाकार घेऊन मित्र मंडळाच्या वतीने पांचाळ कुटुंबियांना ₹३५,००० ची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.

स्व. श्रीधर पांचाळ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गायन-वादन करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. घराचा कमावता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्यासमोर तीव्र आर्थिक आणि सामाजिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या कठीण प्रसंगी अमित भाऊ बोंडले यांनी पांचाळ कुटुंबियांचे सांत्वन केले आणि भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्रीधर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शब्द त्यांनी दिला. विशेषतः त्यांच्या पत्नी व मुलांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करणार असल्याचे बोंडले यांनी यावेळी सांगितले.

मदतीची रक्कम सुपूर्द करताना गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटकाळात दिलेली ही मदत पांचाळ कुटुंबासाठी अत्यंत मोलाचा आधार ठरणारी आहे, अशी भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली. अमित भाऊ बोंडले मित्र मंडळाच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद मदतकार्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी साहेबराव पाटील सुगावे, तिरुपती पाटील सुगावे, मारोती कचलवाड, जळबा पाटील सुगावे, दत्तात्रय पाटील सुगावे (गुरुजी), व्यंकटराव पाटील ढगे, पंडित पाटील सुगावे, भगवान पाटील सुगावे, माजी सरपंच प्रतिनिधी मोहनराव जोगेवार गुत्तेदार, मोहन तुरटवाड, माजी ग्रा.पं. सदस्य बालाजी तुरटवाड, अशोक सुगावे (गुरुजी), व्यंकटराव सुगावे, चांडोळकर साहेब, विठ्ठल यमलवाड, चांदपाशा शेख, साधू बोंडले, गणपत गजभारे, दिगंबर गंगासागरे, कैलास पाटील सुगावे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे, खाजामियां शेख, बबन पाटील जगताप, अजीम शेख, विलास बोंडले, विजय यमलवाड, लक्ष्मण कासराळे, विकास कळकटवाड, भाजपा तालुका सरचिटणीस शंकर यमलवाड, योगेश तुरटवाड, व्यंकट यलपलवाड, माधव कंचलवाड, गंगाधर पांचाळ, अच्युत पांचाळ, शंकर पांचाळ, आकाश कळकटवाड, राहुल बोंडले, राजू पांचाळ, चंदू पांचाळ यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker