काँग्रेस आणि महाविकास आघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा – सुजात आंबेडकर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत वंचितांना संरक्षण देण्याच काम केले आहे. पण बाळासाहेबांच्या आजारपणाच राजकारण करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब आय सी यु मध्ये बसून भावनिक वातावरण निर्माण करुन मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही काहीजन आरोप करत आहेत. एखाद्या व्यक्ती आयसीयु मध्ये अँडमिट असतांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले वाईट चिंतत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत यांना धडा शिकवायचा आहे असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.
वंचित बहूजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर आणि नायगाव विधानसभेचे उमेदवार डॉ. माधव विभुते यांच्या प्रचारार्थ नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात दि. 13 रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की लवकरच बाळासाहेब मैदानात उतरून मँथेरान सभा घेतील पण आजारपणाच राजकारण करुन ज्यांनी ज्यांनी नावे बोटे ठेवली त्यांच्याविरुद्ध वंचितचे तरुण पेटून उठतील. आमचा तरुण एकदा का पेटून उठला ना यांना महाराष्ट्र तोंड लपवायला जागा मिळणार नसल्याची खरमरीत टिका केली. जसे आजारपणाचे वाईट राजकारण करण्यात आले तसेच आजपर्यंत या लोकांनी आंबेडकर वाद संपवण्याचा प्रयत्न केला, षडयंत्र करुन बाबासाहेब, भैय्यासाहेब, बाळासाहेब आनंदराज साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोपही सुजात आंबेडकरांनी केला.
राज्यातील प्रस्थापित पक्षांनी नेहमीच वंचित बदल चुकीचे राजकारण करत आले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला कि काँग्रेसवाले आपल्याला भाजपची ‘बी’ टिम म्हणतात ते आपापसात लढले की मैत्रीपुर्ण लढत ठरते. यावरुन प्रस्थापित पक्ष हे फक्त जातीयवादी राजकारण करतात. आम्हाला एकीकडे’बि’ टिम म्हणताना नांदेड जिल्ह्यातील दोन भाऊ निवडणुकीच्या मैदानात आहेत तर दुसरीकडे भाजपच उमेदवारांचे व्यवसायीक भागीदार खतगावकर आणि अशोकराव चव्हाणांचे नातेवाईक खतगावकर ये रिश्ता क्या कहलाता म्हणून हे प्रस्थापित नात्यगोत्यांचे राजकारण करतात त्यामुळे वंचित जागे झाले पाहीजे आणि या निवडणुकीत त्यांना धडा शिकवतांना वंचित बहूजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अविनाश भोसीकर व नायगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार डॉ माधव विभुते यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
या सभेला वंचितचे युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका निरीक्षक भीमराव बेंद्रीकर, जिल्हा सदस्या करुणाताई खंडेलोटे, धर्माबाद तालुका अध्यक्ष माधव जिंकले, अकबर शेख, नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर, नायगाव तालुका उपाध्यक्ष सतीश वाघमारे, नायगाव तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड, धम्मानंद सोनकांबळे, विलास वाघमारे, युवा जिल्हा सचिव बालाजी गायकवाड सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, माधव इंगळे, राहुल सोनकांबळे, धम्मानंद जोंधळे, ऋषिकेश धनवाडे, राजीव राचोटकर, शिवाजी पवार, राहुल गायकवाड, शिवकुमार बैलकवाड, दीपक जमदाडे, शुदोधन लांडगे, बाळासाहेब दुधारे यांच्यासह मोठ्या संख्येने दलित मुस्लिम व ओबीसी मतदार उपस्थित होते.