गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मार्ग व स्थळाची उपविभागीय पोलिस अधिका-यांनी केली पाहणी

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मार्गाची पाहणी धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांनी दि.११ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता केली. या अनुषंगाने त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.

कुंडलवाडी शहरात ४७ ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली.यानिमित्त शहरातील गणेश मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसासह गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आले आहे. दरम्यान, गणेशमूर्ती विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळाची धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांनी पाहणी केली.

यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,पोहेकाँ मिलिंद नरबाग,पोकाँ इद्रिस बेग आदींची उपस्थिती होती. गणेशमूर्ती विसर्जन स्थळाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker