ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव मध्ये जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरा

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : इस्लामचे धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी च्या अनुषंगाने जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जुलूसमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, लहान मुले, मुली व परिसरातील असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ता.२२) सप्टेबंर २०२४ रोजी नायगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठ्या जयघोषात निघालेल्या व जुलूस मध्ये नायगाव शहरासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी सरबत, फळे, लड्डू, चॉकलेट, बिस्किट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

सकळी १० वाजता (जुलूस ए मोहम्मदी) मदरसा बनात मिरलणुकीला प्रारंभ झाले. त्यानंतर नांदेड हैद्राबाद हायवे मार्गावरून हेडगेवार चौक, शिवाजी चौक, नगरपंचायत रोड होत हजरत तवकल शहावली दर्गाह येथे मिरवणुक पोहचल्यानंतर फातेहखानी सलाम व दुवा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सय्यद रहिमसेठ, जुनैद पठाण, अ.करीम चाऊस, शेख अयुबभाई, सय्यदभाई मुल्ला, हाजी तोफीक बागवान, इशाभाई, नईम भैंसेकर, इमरान बागवान, शेख आसीफ, पठाण समीर, शेख रफीक.

बुरहान कच्छी, शेख मैनोदीन, सय्यद सिंकदर, साजीद पठाण, बिलाल पठाण, जाफर सय्यद, फेरोज पठाण, मोहम्मद चाऊस, शेख माजीद हालदेकर, सय्यद फयाज, खदीर बागवान, मुजाहिद सिद्दिकी, मुहीब शेठ कच्ची, अंजार बिलोलीकर, अबू बकर मुस्तजर, आदम रहीमतुल, बाबू जिलानी साब, बबलू चांद साब, जाफर जलाल साब यासह अंसख्य समाज बांधव उपस्थित होते.

केशवराव पा.चव्हाण, माधवअप्पा बेळगे, हणमतराव पा.चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, विजय पा.चव्हाण, विठ्ठल पा.गवळी, संजय चव्हाण, शरद भालेराव, पांडुरंग पा.चव्हाण, नारायन पा.जाधव, माणिक पा. चव्हाण,अजिंक्य पा.कल्याण यासह अनेकांनी जुलूस ए मोहम्मदी मध्ये सहभागी होऊन मुस्लिम बांधवाना भरभरून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker