ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुणाल पवारे सचिव पदी डॉ.माधव हळदेकर यांची बिनविरोध निवड

कुंडलवाडी :- येथील शहर मराठी पत्रकार संघाची दि.३ जानेवारी रोजी पत्रकार शंकर कोंडावार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार गणेश कत्रुवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत शहर मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुणाल पवारे यांची व उपाध्यक्षपदी हरिष देशपांडे तर सचिव पदी डॉ.माधव हळदेकर व कोषाध्यक्ष पदी शंकर कोंडावार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. सदस्यपदी गणेश कत्रुवार,नरेंद्र जिठ्ठावार, मैनोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.