महिलेस अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

मोरे मनोहर
किनाळा :- टाकळी बु तालुका नायगाव येथे बौद्ध समाजाच्या वस्तीतील घरात घुसून घरात एकटी असलेल्या महिलेला अश्लील भाषेत जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केले याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
सविस्तर माहिती अशी की टाकळी बु तालुका नायगाव येथील गणेश सुधाकर भिलोंडे हा दि.22 ऑक्टोंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास बौद्ध समाजाच्या वस्तीतील एकटीच महिला घरात असल्याचे पाहून घरात घुसून सदरील विवाहित महिलेचे दोन्ही हात दाबून धरून तिला जवळ ओढू लागला तेव्हा त्याला सदरील महिना विरोध केले तेव्हा तो तिला अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करू लागला तेव्हा ती जोरात आरडाओरडा केल्याने सदरील महिलेच्या घराकडे तिचा चुलत भाऊ धावत आला असता त्याला पाहून तो घराबाहेर पळून गेला.
मात्र या झालेल्या झटापटीत विवाहित महिलेच्या हातातील बांगड्या फुटून तिच्या हाताला जखमा झाल्या. एवढ्यावरच तो न थांबता परत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सदरील विवाहित महिलेची आई घरी आल्यानंतर विवाहित महिलेसह तिच्या आईला थापड बुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक भाषेत शिवीगाळ केले.
या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात सदरील विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सुधाकर भिलोंडे यांच्या विरोधात कलम 75, 333, 296, 115(2), 351(2), 351(3), 3(1)(W)(1)3(1)(w)(11) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.