संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत १७५ पात्र प्रकरणांना मंजूरी

शेषेराव कंधारे
नायगाव :- नायगाव तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि.२६ मार्च रोजी पार पडली. या बैठकीत विविध योजनांच्या १९६ प्रकरणांपैकी १७५ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देण्यात आली.
नाययगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत १९६ प्रकरणे तपासणीसह मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. या बैठकीत श्रावण बाळ योजनेतील ११२ व संजय गांधी निराधार योजनेचे ६३ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर २१ प्रकरणे त्रुटी असल्यामुळे नामंजूर करण्यात आली. तहसीलदारांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीत सचिव म्हणून नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाजे, नायब तहसीलदर कुलकर्णी, महसूल सहायक इंगोले, गुरु कदम सह महसूल कर्मचारी उपस्थित होती.