मला शह देण्याइतपत कुणातही क्षमता नाही
नाव न घेता अशोकरावांनी घेतला आ.चिखलीकरांचा समाचार

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : कोण कोणत्या पक्षात जाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रवेश सोहळे कुणीही घेवो आणि कितीही मोठे घेवू द्या मला शह देण्याची क्षमता कुणातही नाही. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नाव न घेता आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा समाचार घेतला.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील एक कार्यक्रम आटोपून नरसी येथे भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी नरसी येथे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर राजकीय टिकाटिपण्णी केली होती. त्यासंदर्भातच पत्रकारांनी अशोकरावांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी कुठलेही सनसनाटी वक्त न करता अतिशय संयमाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जागा कुणी किती लढवायच्या का स्वबळावर लढायच हा पुढचा प्रश्न आहे. आणि निवडणूक कशी लढवायची हे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे माझ कुठलही अस वक्तव्य राहणार नाही ज्यातून महायुतीत गैरसमज निर्माण होतील. मी सकारात्मक भुमिका घेवून चालणारा माणूस आहे उलट महायुतीच्या सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडीच्या संदर्भात आपली भुमिका मांडली पाहिजे कारण आमची खरी लढत महाविकास आघाडीशी आहे.
भास्करराव खतगावकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना अशोकराव म्हणाले की, मी राजकारणात नात्यागोत्यापेक्षा पक्षाची भुमिका घेवून चालणारा नेता आहे त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे असे स्पष्ट केले. अशोकराव चव्हाण यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मोठमोठे पक्षप्रवेश सोहळे घेत आहेत का यावर बोलताना म्हणाले मी शह काटशहाच्या पुढे गेलेलो आहे आणि मला शह देण्याइतपत कुणाचीही क्षमता नाही असे नाव न घेता आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचा समाचार घेतला.
श्रावण भिलवंडे हे भाजपचे नेते आहेत आणि ते या भागाचे अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांनी माझी आठवण केली आणि त्यांच्या भेटीसाठी आलो. भिलवंडे यांच्या पाठीशी ताकत उभी करणे माझे काम असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
अशोकराव चव्हाण हे पहील्याच श्रावण भिलवंडे यांच्या निवासस्थानी आले असल्याने श्रावण भिलवंडे यांनी त्यांचे फटाक्यांची अतिषबाजी करुन जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर, नरेंद्र चव्हाण, बालाजी बच्चेवार, किशोर स्वामी यांची उपस्थिती होती.