श्रावण भिलवंडे यांच्याकडून नरसीत अशोकराव चव्हाण यांचे जंगी स्वागत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : भाजपाचे युवा नेते तथा माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे मित्र मंडळाच्या वतीनी शनिवारी दुपारी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे जेसीपीने फुलांचा हार टाकून व फटाक्याची अतिश बाजी करत नरसी येथील चौकात भव्य सत्कार करण्यात आला.
खासदार अशोकराव चव्हाण हे शनिवारी सगरोळी येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.तेथून परत नांदेड कडे जात असताना श्रावण पा.भिलवंडे मित्रमंडळाच्या वतीने नरसी चौकात जेसीबी च्या साह्याने फुलाचा मोठा हार घालुन पुष वृष्टी करत फटाक्यांची अतिशय बाजी करून खा.चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी श्रावण पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन सदस्याच्या वतीने खा.अशोकराव चव्हाण व मान्यवरांचे स्वागत करण्यात आला.
यावेळी आ.रितेश अंतापुरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नरेंद्र चव्हाण, माजी महापौर दिलीप स्वामी, भाजपाचे प्रवक्ते तथा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोस पाडागंळे, राजेश शिंदे आदीची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा मारोती भिलवंडे, गजानन भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहिम बेग, व्यंकट कोकणे, वसंत कस्तुरे, गंगाधर वडगावे, मारोतराव वडगावे, व्यंकट कोकणे, पांडुरंग नागेश्वर, अलिम पटेल, जयवंतराव गायकवाड, तुळजाभवानी जिनिंगच्या वतीने सत्कार, सय्यद इस्माईल, सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.