नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त
महसूल विभागाची धाडसी कारवाई

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे गोदावरीनदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे 3 इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे.

गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपो शिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा करून आवश्यकता पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनातर्फे गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले. महसूल विभागाने केलेली ही धाडसी कारवाई समजली जाते.

याकामी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नहणू कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे इत्यादी सहभागी होते.
