ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी शहरात डासांची मोठ्या प्रमाणात वाढ फवारणी करण्याची नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

कुंडलवाडी :- शहरात गत काही दिवसांपासून नाली व गटारांची साफसफाई केली नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डेंगू रोग होण्याचे प्रमाणातही वाढ झाली आहे.त्यामुळे नाली व गटारांची साफसफाई करण्यात येऊन जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दि.१४ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनावर शहरातील नागरिक शिवकुमार खांडरे, भीम पोतनकर, कृष्णा करपे, संतोष करपे, बालाजी खांडरे, दत्ता कापकर सयाराम खांडरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.