पत्रकार धम्मानंद भेदेकर यांना धम्म सारथी पुरस्कार प्रदान

मोरे मनोहर
किनाळा :- बेटमोगरा येथिल बु.दत्ता गंगाराम सोनकांबळे यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवाभावी संस्था बेटमोगरा यांच्या वतीने दिला जाणारा धम्म सारथी हा पुरस्कार पत्रकार धम्मानंद भेदेकर यांना देऊन गौरविण्यात आले.
चिटमोगरा तालुका बिलोली येथील ग्रामीण भागातील एक निर्भीड पत्रकार म्हणून गेल्या एक दशकापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धम्मानंद भेदेकर यांच्या कार्याची दखल घेऊन बेटमोगरा तालुका मुखेड येथील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा सन 2025 चा धम्म सारथी हा पुरस्कार दि.14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी भंतेजी संघप्रिय राहूननगर नांदेड, केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हौसाजी वारघडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, भारतीय बौद्ध महासभेचे मुखेड तालुका अध्यक्ष तथा पत्रकार गंगाधरजी सोंडारे, डॉ.राहुल कांबळे, युवा व्याख्याते तथा उपसरपंच सिद्धार्थ कांबळे बेळीकर, वंचित बहुजन आघाडी मुखेड तालुका संघटक अँड.संजयजी भारदे, अँड सचिन वाघमारे, मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.