ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरात पोलिसांचे पथसंचलन

कुणाल पवारे

कुंडलवाडी :- शिवजयंती निमित्त शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कुंडलवाडी पोलिस स्टेशनच्यावतीने पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दि.१८ फेब्रुवारी रोजी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त कुंडलवाडी शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात व कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वात दि.१८ फेब्रुवारी रोजी पथसंचलन करण्यात आले.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ माधव पाटील, पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ गफूर शेख, पोकाँ इद्रिस बेग, रवि देशमुख, महिला पोलीस कर्मचारी दिपाली बागुलवाड, शाईन शेख यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान या पथसंंचालनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker