ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा तहसीलदारांनी पकडला

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : कुठलाही रेती घाट चालू नसताना चोरीच्या रेतीची अवैध वाहतूक करणारा एम एच 26 बी ई 3070 या क्रमांकाचा हायवा मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी बरबडा टाकळी रोडवर पकडला आहे. सदर हायवाच्या मुजोर मालकाने पकडलेला हायवा सोडण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला पण तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात लावला असून त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कुठेही अधिकृत रेती घाट सुरु नसताना नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती येत होती. या अवैध रेतीला महसूल विभागातील काही तलाठी व मंडळ अधिकारी छुपा पाठींबा देत आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माफीया रेतीची अवैध वाहतूक करत आहेत. चोरट्या रेतीच्या वाहतुकीला आळा घालून धडक कारवाई करण्याची मोहीम तहसीलदार सौ. धम्मप्रिया यांनी सुरु केली असून. यापूर्वी त्यांनी टाकळी शिवारात दोन बोटी उध्वस्त करुन माफीयाला चांगलाच दणका दिला होता.

माफीयांना दणका दिल्यानंतरही चोरट्या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली त्यामुळे तहसीलदार सौ. गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी ७ च्या दरम्यान बरबडा शिवारात निघाल्या होत्या. त्या बरबडा पुलावरून टाकळीकडे जात असतात समोरुन एक हायवा येतांना दिसली. त्या हायवाला थांबवून रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता चालकाने काहीही नाही असे सांगितले. त्यामुळे कुंटूर पोलिसांना पाचारण करण्यात आले व पुढील कारवाईसाठी कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला.

रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा थांबवल्यानंतर हायवा मालकाने मुजोरी करण्याचा बराच प्रयत्न केला मात्र तहसीलदार सौ. गायकवाड यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता हायवा कुंटूर पोलीस ठाण्यात लावला आहे. या हायवावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker