ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रेती माफीयांची मुजोरी… एक जाग्यावरुन तर दुसरी तहसीलच्या प्रांगणातून हायवा पळवली…

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा महसूल विभागाने काल दि. 5 रोजी पकडले. पण यातील एक हायवा जाग्यावरुनच पळवण्यात आली तर दुसरी हायवा चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवण्यात आली. या दोन प्रकारामुळे रेती माफीयांची मुजोरी किती वाढली आहे याचा अनुभव महसूल विभाग घेत असून. दोन्ही वाहणावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा शिवारात सगळ्यात जास्त अवैध रेतीचे उत्खनन होत असून या प्रकाराला त्या भागाचे मंडळ अधिकारी शितल स्वामी या पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे. कारण तहसीलदार सौ.गायकवाड यांनी याच भागात दोन मोठ्या कारवाया करुन माफीयांना दणीतर दिलाच होता पण दोन घटनेत तीन बोटी स्फोटक लावून उडवल्या आहेत.

मात्र या कारवाईत मंडळ अधिकारी शितल स्वामी या कुठेच नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी नाराज होते परंतु काल दि. 5 रोजी दुपारी त्या बरबडा भागात अवैध रेतीच्या हायवाने लहान मुलाला कट मारण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांनी पकडून महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.

त्यामुळे मंडळ अधिकारी शितल स्वामी या बरबडा येथे पोहचल्या मात्र यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी पुढील कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या. या दरम्यान बरबडा येथूनच एक हायवा पळवण्यात आली. पण मंडळ अधिकारी स्वामी यांनी सोडून दिल्याचा आरोप तेथील नागरिक करत आहेत. तर दुसरी हायवा एम.एच. 26, बी ई 1614 ही नायगाव तहसील कार्यालयात लावण्यात आली. परंतु दि. 5 मार्चच्या रात्री सदरची हायवा तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून पळवण्यात आल्याची घटना घडली.

या प्रकारामुळे रेती माफीयांची किती मुजोरी वाढली हे उघड उघड दिसत आहे. विशेष म्हणजे रात्रीला तहसील, पंचायत समिती व कोषागार कार्यालयाचे रात्रीचे कर्मचारी असताना माफीयांनी चक्क हायवा पळवली. यामुळे एकच खळबळ उडाली असून सदर प्रकरण महसूल विभागाने गांभीर्याने घेतले आहे.

दोन्ही हायवावर गुन्हे दाखल करणार – तहसीलदार

एक हायवा जाग्यावरुनच तर दुसरी हायवा थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून पळवण्यात आल्या प्रकरणी दोन्ही हायवावर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत अशी माहिती तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker