युवा साहित्यीक सोनू दरेगावकर यांना राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव’ पुरस्कार

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- क्रांतीगुरु बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, गुंधा ता.लोणार जि.बुलडाणा यांच्या वतीने, दिनांक 22 मार्च 2025 रोजी. क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मृतीदिनानिमित्त, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार, निवेदक, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड यांना राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव’ पुरस्कार प.पु.ह.भ.प.डॉ.भगवान बाबा आनंदगडकर महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी, डॉ.अंबादास सकट, पत्रकार दिगंबर वाघमारे कंधार, रमेश थोरात, सिध्दार्थ खरात, संजय रायमूलकर, शंकर मानवतकर, विजय अंभोरे, प्रल्हाद धर्माधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोनू दरेगावकर नांदेड लिखित, जगणं दुनियादारीचं या चारोळी संग्राहलयाला साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक कला विभूतीना मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल गिलवलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजक शंकर मानवतकर यांनी आभार मानले.