ताज्या बातम्यानांदेडबिलोली

संगम येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी

◆ कुंडलवाडी पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा भाविकांना फटका ◆तब्बल दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा

कुंडलवाडी :- येथून जवळच असलेल्या धर्माबाद तालुक्यातील त्रिवेणी संगम म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री संगमेश्वर तीर्थस्थान येथे आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संगम येथे जाणाऱ्या रस्त्यावर धर्माबाद तालुक्यातून व कुंडलवाडी कडून येणाऱ्या मार्गावर कुंडलवाडी पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा भाविकांना फटका बसला. तब्बल दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. याचा वयोवृद्ध, लहान मुले, महिला भाविकांना या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.

येथून कुंडलवाडी शहरापासून ११ किलोमीटर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील संगम येथे गोदावरी मांजरा व हरिद्रा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. या ठिकाणी श्री संगमेश्वर देवस्थान आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते तसेच या ठिकाणी मोठी यात्रा ही भरते.

यावर्षी महाशिवरात्री बरोबरच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यास न गेलेल्या भाविक भक्तांची संगम येथे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिकची गर्दी होणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी नियोजन करणे आवश्यक होते.

तेलंगणा राज्याच्या सीमेवर व बिलोली व धर्माबाद तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्री संगमेश्वर येथे धर्माबाद,बिलोली तालुक्यातून व तेलंगणा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीनिमित्त गर्दी झाला. सकाळपासूनच भाविकांनी श्री संगमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

कुंडलवाडी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या संदर्भात केलेले नियोजन अपुरे पडले. तब्बल दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दोन किलोमीटर पासून श्री संगमेश्वर देवस्थान कडे भाविक भपायी चालत आल्याने पोलीस प्रशासनाच्या ढिशाळ नियोजनाचा फटका वयोवृद्ध, लहान मुले, महिला भाविकांना बसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker