लोहगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कंधार तालुक्यातील एका तरुणाने बिलोली तालुक्यातील लोहगाव शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सदरचा तरुण नायगाव तालुक्यातील खैरगाव येथे आपल्या बहिणीकडे राहत होता अशी माहिती समजली आहे. पण आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
कंधार तालुक्यातील मसलगा येथील विश्र्वनाथ गोविंद सुर्यवंशी वय १९ हा अविवाहित असुन गेल्या काही वर्षांपासून नायगाव तालुक्यातील खैरगाव येथे आपल्या बहीणेकडे राहत होता. उपजिविकेसाठी एका वाहनावर क्लिनर म्हणून काम करत होता. सदर युवकाने नरसी बिलोली रस्त्यावर लोहगाव शिवारात रोड पासुन पाचशे फुटावर असलेल्या बारतोंडीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली.
लोहगाव येथील शेतकऱ्यांनी बिट जमदार ए.के.शेख यांना कळविले घटना कळताच जमदार शेख यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचुन पंचनामा केले. सदर युवकाने आत्महत्या का केला हे मात्र कळू शकले नाही.