ताज्या बातम्यानांदेडबिलोली

ओव्हरलोड रेतीच्या हायवाने बिलोलीत घेतला एकाचा बळी

New Bharat Times नेटवर्क

बिलोली : ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवाने धडक दिल्याने स्कुटी चालक जाग्यावरच ठार झाल्याची घटना बिलोली शहरात शुक्रवारी दुपारी घडली. या अपघात ठार झालेल्या ईसमाचा मेंदू रस्त्यावर पडला होता तर डोक्याचा चेंदामेंदा झाला. या प्रकरणात वाहण चालकास अटक करण्यात आली आहे.

बिलोली तालुक्यात रेतीच्या अवैध वाहतुकीने अक्षरशः थैमान घातले असून. खाजगी गटातून रेती उत्खननाची परवानगी घेवून शासकीय जागेतून रेतीचे वारेमाप उत्खनन करण्यात येत असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासन मालामाल होत असले तरी ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र आपला जीव मुठीत घेवून फिरावे लागत आहे. शुक्रवारी दुपारी किशन रामा वाघमारे (६२) हे आपल्या एम एच 12 ईपी 2263 या क्रमांकाच्या स्टुटीवरुन पंचायत समितीकडे जात असतांना पाठीमागून ओव्हरलोड रेतीने भरलेला एम.एच. 12 यु.एम.0032 या क्रमांकाच्या हायवाने पाठीमागून जोराची धडक दिली.

यात किशन रामा वाघमारे हे मागच्या टायरखाली आल्याने डोक्यावरुन चाक गेले. यात त्याचा मेंदू दुरवर फेकल्या गेला तर डोक्याचा चेंदामेंदा झाला. सदरच्या अपघाताची माहिती समजताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले घटनास्थळी दाखल झाले व हायवा आणि वाहन चालकास ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवुन दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

खाजगी घाटाच्या नावाखाली महसूल आणि पोलीस विभागाने रेतीचा गोरखधंदा सुरु केला असून. यातून खालपासून ते वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे हात ओले करण्यात आले असल्याने नियमबाह्य रेतीचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker