अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रवेश देण्यात यावे – आ.जितेश अंतापूरकर

मोरे मनोहर
किनाळा :– बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक कारणामुळे अनेक अडचणी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थीना येत असल्याने सामान्य कुटुंबातील कित्येक होतकरू व हुशार असणारे विद्यार्थी शासनाच्या किचकट असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत तरी शिक्षण मंडळांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबधित अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ऑफलाइन प्रवेश देण्यात यावा अशी मागणी बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केले.
बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघ हा मागासलेला असून या मतदारसंघात अद्याप इंटरनेट सुविधा म्हणावी तशी सुरळीत नसल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा सुरळीत चालत नाही, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचे पूर्णपणे ज्ञान नसल्याने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन केल्यानंतरच विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार असल्याने इंटरनेटच्या तांत्रिक येणाऱ्या अडचणीमुळे ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत सरकारने तात्काळ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करून ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेचा पर्याय खुला करावा,” अशी मागणी देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली आहे.
आ.अंतापूरकर यांनी सभागृहात स्पष्ट केले की, देगलुर बिलोली मतदारसंघातील दहावी उत्तीर्ण होणाऱ्यां विद्यार्थी ची टक्केवारी लक्षणिय आहे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. आयटीआय, नर्सिंग, पॉलिटेक्निकल शाखेतून पदविका अभ्यासक्रम पूर्ण करूनही रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थी आता पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत पदवी शिक्षणाकडे वळत आहेत. परंतु ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना वेबसाईट स्लो होणे, अनेक वेळा क्रॅश होणे, तसेच विहित कालमर्यादा ओलांडणे या तांत्रिक अडचणी समोर येत आहेत.”
ग्रामीण भागात अद्यापही दर्जेदार इंटरनेट सेवा नाही, विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रिया समजत नाही आणि संगणकीय कौशल्याचा अभाव आहे. अशा स्थितीत शासनाने ग्रामीण भागात किमान ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेस परवानगी द्यावी,” अशी मागणी करत आ. जितेश अंतापूरकर यांनी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी केले.